हजार-पाचशेच्या नोटा "महाबीज' घेईना 

उमेश वाघमारे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

जालना - चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांत घेतल्या जात असल्या, तरी "महाबीज'चा मात्र यासाठी अपवाद केल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना रब्बी बियाणे खरेदीसाठी आणलेल्या हजार-पाचशेच्या नोटा माघारी न्याव्या लागत आहेत. 

राज्य बियाणे महामंडळ "महाबीज'कडून प्रत्येक जिल्ह्यात बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. या माध्यमातून शुद्ध बियाणांची निर्मिती केली जाते. सध्या हरभरा आणि गव्हाची पेरणी जालना जिल्ह्यासह राज्यात सुरू आहे. जालना जिल्ह्यात सुमारे दोनशे हेक्‍टरवर गव्हाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत थेट महाबीजकडून शेतकऱ्यांना बियाणांची विक्री केली जाते. बियाणांची खरेदी करताना महाबीजकडे शेतकऱ्यांना चलन भरावे लागते; परंतु चलन भरताना शेतकऱ्यांकडून पाचशे आणि हजारांच्या नोटांचा भरणा करण्याची "महाबीज'ने दारे बंद केली आहेत. तसेच महाबीजकडून कृषी केंद्रांना बियाणांची विक्री करतानाही या नोटा घेतल्या जात नाहीत. परिणामी कृषी केंद्र चालकही शेतकऱ्यांकडून या नोटा घेत नाहीत. त्यामुळे रब्बीच्या पेरणीचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत सरकारकडून सूचना नाहीत. त्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे दिल्यानंतर जुन्या नोटा आम्ही घेऊ शकत नाही. 

एस. एस. नवोड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज. 

Web Title: Thousand-five hundred notes mahabija'would not accept

टॅग्स