मी एका भाजप आमदाराचा खून करणार आहे...; फेसबुक पोस्ट व्हायरल

प्रकाश बनकर
रविवार, 24 जून 2018

'मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत असेल तर मला थांबवा' अशी धमकीवजा पोस्ट फेसबुकपेज टाकली.

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना शनिवारी (ता. 23) एका युवकांने सोशल मिडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली. संभाजीराजे भोसले असे या युवकांचे नाव असून 'मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत असेल तर मला थांबवा' अशी धमकीवाज पोस्ट फेसबुकपेज टाकली. दरम्यान प्रतिक्रीयेत त्यांने आमदार अतुल सावे यांचे नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पोस्टच्या विरोधात रविवारी (ता. 24) भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्‍तांची भेट घेत धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी केली. 

शहरातील युवराज छत्रपती संभाजीराजे इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड येथे संचालक म्हणून काम करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांने गुरुवारी (ता. 23) रात्री उशीरा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करून भाजप आमदाराचा खुन करणार असल्याचे सांगितले. फडणवीस सरकार फक्‍त ब्राम्हणांना संरक्षण देत असल्याचा आरोप या तरुणांने केला. या धमकीची माहिती सर्वत्र पसरताच भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश नावंदर, प्रदेश प्रवक्‍ते शिरिष बोराळकर, मंगलमंत्री शास्त्री, विजय शिंदे यांनी रविवारी पोलिस उपायुक्‍त दिपाली घाटे-घाडगे यांना निवेदन देत आरोपीस अटक करा आणि तडीपार करा अशी मागणी केली. 

या तरुणाची कुठेतरी नाराजी दिसत आहे. त्याच्या फेसबुकपेज वरून धमकी दिली आहे. सरकारचे नाव घेतोय इतरांचे नाव घेतोय. या विरोधात आमचे भाजपचे कार्यकर्ते प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व इतर लोक पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले आहेत. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. 
- अतुल सावे, आमदार 
 

Web Title: Threats to kill to MLA Atul Save facebook post gone viral