नेहरकर हल्ला प्रकरणातील तिघे ताब्यात

पुण्याच सापळा रचून आवळल्या मुसक्या
आरोपींसह कारवाईत सहभागी पोलिसांचे पथक.
आरोपींसह कारवाईत सहभागी पोलिसांचे पथक.Sakal

केज - तुझ्या मुलीचा विवाह माझ्यासोबत का करून देत नाहीस... असे म्हणून एका तरुणाने दुचाकी अडवून मुलीच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी गज घालून गंभीर जखमी केल्याची घटना ता. नऊ एप्रिल रोजी केज-कळंब रस्त्यावर घडली होती. या हल्ल्यातील जखमीचा घटनेच्या दोन दिवसानंतर उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील तिन्ही हल्लेखोर परराज्यात फरार झाले होते. मात्र आरोपींच्या शोधात असलेल्या केज पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून बुधवारी (ता. १३) तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील साळेगाव शिवारातील केज-कळंब रस्त्यालगत असलेल्या फरीदबाबा शेख दर्ग्याजवळ असलेल्या संत सेना महाराज यांच्या मंदिराजवळ रमेश एकनाथ नेहरकर (वय ४२) हे ता. नऊ एप्रिल रोजी दुपारी दुचाकीने केज शहराकडे येत होते. यासुमारास तिघांनी त्यांची दुचाकी अडवून संगनमत करून रमेश नेरकर यांना डोक्यात लोखंडी गजाने घाव घालून गंभीर जखमी केले होते. यातील जखमीवर लातूर येथे उपचार सुरू होते. ता.अकरा एप्रिल रोजी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. मृत्यू होताच संतप्त नातेवाइकांनी मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे गुन्ह्यांचे गांभीर्य विचारात प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तत्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलिस नाईक अनिल मंदे व साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह पोलिस पथक हल्लेखोरांच्या शोधात विविध ठिकाणी रवाना झाले होते.

दरम्यान तिन्ही आरोपी झाशी येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रेल्वेने पुणे मार्गे दक्षिणेत जाण्याच्या तयारीत असताना पुणे शहरातील वाघोली परिसरातून साहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर मिसळे यांच्या पथकातील अनिल मंदे व दिलीप गित्ते यांनी तिन्ही आरोपींना पुणे शहरातील वाघोली परिसरातून बुधवारी ताब्यात घेतले. घटनेतील मुख्य सूत्रधार भागवत संदीपान चाटे (रा. तांबवा, ता. केज) व त्याचे इतर दोन साथीदार शिवशंकर हरिभाऊ इंगळे (रा. इंगळे वस्ती, केज) व रामेश्वर नारायण लंगे (रा. जहागीर मोहा, ता. धारूर) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com