esakal | परतूर खूनप्रकरणी तीनजण अटकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

murder

जालना : परतूर शहरातील कुंदन खंडेलवाल खून प्रकरणात अखेर स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना सोमवारी (ता. दोन) अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, एक बुलेट, सोन्याची चेन असा दोन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा खून वैयक्तिक वाद आणि आर्थिक व्यवहारातून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. मात्र या खुनास वेगळी किनार आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.

परतूर खूनप्रकरणी तीनजण अटकेत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : परतूर शहरातील कुंदन खंडेलवाल खून प्रकरणात अखेर स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना सोमवारी (ता. दोन) अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, एक बुलेट, सोन्याची चेन असा दोन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा खून वैयक्तिक वाद आणि आर्थिक व्यवहारातून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. मात्र या खुनास वेगळी किनार आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. 

परतूर शहरातील सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर 31 ऑगस्ट रोजी भरदुपारी कुंदन खंडेलवाल याचा खून झाला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर कुंदन खंडेलवाल याचा शेजारी व मित्र राहुल रामजीवन खंडेलवाल ऊर्फ रोहित शर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी राहुल खंडेलवाल ऊर्फ रोहित शर्मा याने पृथ्वीराज अंभोरे व अनिल सोनवणे यांच्यासह कुंदन खंडेलवाल यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पृथ्वीराज देविदास अंभोरे (रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, परतूर) व अनिल विठ्ठल सोनवणे (रा. मानेगल्ली, परतूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. संशयित पृथ्वीराज अंभोरे याच्याकडून बुलेट, मृताच्या गळ्यातील सोन्याची चेन व अनिल सोनवणे याच्याकडून गावठी पिस्टल असा दोन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

मोबाईल डाटा रिकव्हरी करण्याचे काम सुरू 
कुंदन खंडेलवाल याचा खून केल्यानंतर संशयितांनी त्याचा मोबाईल फोडला. त्यामुळे पोलिसांकडून कुंदन खंडेलवाल याच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यातून अजून काही माहिती पुढे येईल, असा अंदाज आहे. 

ताब्यात घेतलेल्या संशयित तिघांनी कुंदन खंडेलवाल याचा खून करण्याचा कट जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर रचला. तेथे कुंदनला बोलावून घेतले. तेथून दोन दुचाकींवरून हे चौघे सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर गेले. त्यानंतर अचानक कुंदन खंडेलवाल याच्या डोक्‍यात पिस्टलने गोळी झाडून त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन हे तिघे बुलेटवर फरारी झाले होते. 
 
loading image
go to top