गोदावरीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पाथरी - पोहायला गेलेल्या शालेय तीन मुलांचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गोपेगाव (ता. पाथरी, जि. परभणी) येथे आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. यातील दोन मुले एकाच कुटुंबातील आहेत.

पाथरी - पोहायला गेलेल्या शालेय तीन मुलांचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गोपेगाव (ता. पाथरी, जि. परभणी) येथे आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. यातील दोन मुले एकाच कुटुंबातील आहेत.

आदित्य अमृत गिराम (वय 12), हृषीकेश अच्युत गिराम (11) व रामा सोपान ढगे (11) हे गावालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. ढालेगाव बंधाऱ्याचे बॅंक वॉटर गोपेगावच्या नदीपात्रापर्यंत आहे. अंदाज न आल्याने हे तिघे पाण्यात बुडू लागले. नदीकाठावरील काही महिलांनी आरडाओरड केल्याने काही तरुण घटनास्थळी धावले व त्यांनी पाण्यात उड्या घेऊन तिघांनाही बाहेर काढले. संबंधितांच्या कुटुंबीयांनी या तीन मुलांना पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी तपासून तिघेही मृत झाल्याचे घोषित केले. यातील आदित्य गिराम व हषीकेश गिराम हे सख्खे चुलतभाऊ होते.

Web Title: three child death in drawn

टॅग्स