बेपत्ता तीन मुलांचे तलावामध्ये मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सिल्लोड - सिल्लोडजवळील रजाळवाडी परिसरातील पाझर तलावामध्ये तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.११) दुपारी घडली. हे तिघेही शहरातील अब्दालशहानगरातील रहिवासी असून, त्यातील दोघे चुलतभाऊ आहेत.  

तालेबखाँ आसेफखाँ पठाण (वय १३), मोहंमदखाँ उमरखाँ पठाण (१२), सोफियान युसूफ पठाण (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघे मित्र मंगळवारी (ता. दहा) दुपारी तीनच्या दरम्यान घराबाहेर पडले. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. मंगळवारी रात्री उशिरा ते हरवल्याची माहिती देण्यात आली. रजाळवाडी तलावात आज दुपारी तीनच्या सुमारास तिघांचेही मृतदेह तरंगताना आढळले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगीरथ देशमुख यांना भाजपचे पदाधिकारी कमलेश कटारिया यांनी घटनेची माहिती दिली. तिघेही शहरातील नॅशनल उर्दू शाळेत शिकत होते. तालेब व मोहंमद सातवीत, तर सोफियान पाचवीत होता. मोहंमद पठाण याचे आई-वडील मुलीकडे जयपूरला गेले आहेत. सोफियानचे वडील युसूफ पठाण हे बुधवारी मुलांच्या शोधासाठी जालन्यात नातेवाइकांकडे गेले असल्याची माहिती मिळाली.

Web Title: three children deathbody receive in pond