तीन आचारसंहिता पथके सज्ज

तीन आचारसंहिता पथके सज्ज

सोयगाव (बातमीदार) ः विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता पथके सज्ज करण्यात आली असून, सोमवारपासून निवडणूक कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरीय आचारसंहिता कक्ष अधिकारी किंवा गटविकास अधिकारी कार्यालयात तातडीने हजर होण्याचे आदेश पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सोयगाव तालुक्‍याचे क्षेत्र कन्नड आणि सिल्लोड या दोन विधानसभा मतदारसंघांना जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या रचनेनुसार सिल्लोड, कन्नड विधानसभा मतदारसंघांतील गावांकरिता आचारसंहिता पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये तीन पथके सज्ज झाली असून, कन्नडसाठी एक, सिल्लोडसाठी दोन अशी ही तीन पथके तयार करण्यात आली आहेत. तीनही पथकांचे प्रमुख गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे आहेत. तीन पथकांमध्ये नऊ कर्मचारी आहेत. तीन पथकांमध्ये फिरते, छायाचित्रण आणि स्थिर निरीक्षण अशी विभागणी करण्यात आली आहे. यासाठी कन्नड मतदारसंघातील सोयगाव तालुक्‍यातील गावांसाठी उपविभागीय अधिकारी जनार्दन विघाते, सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे, कन्नड तहसीलदार संजय वारकड, पोलिस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, सीताराम म्हेत्रे, कक्ष प्रमुख गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे हे या पथकांचे नियंत्रण करतील. सिल्लोडसाठी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे हे पथकाच्या कामावर नियंत्रण करतील. पथकांचे ठिकाण सोयगाव शहर, फर्दापूर, सोयगाव फाटा, वरठाण, बनोटी हे आहे.

क्षेत्रीय अधिकारी खालीलप्रमाणे

क्षेत्रीय अधिकारी म्हणून कन्नड-सिल्लोड विधानसभा मतदान क्षेत्रासाठी प्रा.एस.एस चौधरी, प्रा. श्रीकृष्ण परिहार, प्रा.आर.आर खडके, प्रा.मनोज चोपडे, प्रा.रामेश्वर मगर, प्रा.संतोष पडघन, प्रा. विनोद चव्हाण, राखीव म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळे, अनिल मिसाळ, के.आर निसाळ आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. मास्टर ट्रेनर किरण पाटील, रवींद्र तायडे, दीपक बाविस्कर, पी.पी साळुंखे, योगेश फुसे, संदीप खंडागळे, दयानंद बाजुळगे, एल.एस कोळी, अनिल सूर्यवंशी आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com