ब्रेकिंग ः उदगीरमधील २६ पैकी तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Udgir Corona Updates, Latur
Udgir Corona Updates, Latur

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या २६ जणांच्या स्वॅबपैकी १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन व्यक्तींची पुनर्तपासणी होणार आहे तर तीन व्यक्तींचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकुर यांनी सोमवारी (ता.२७)दिली. पण, कोरोनाची लागण झालेले तिघेजण हे नेमके कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.


उदगीरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी (ता.२५) मृत्यू झाल्याने लातूर जिल्हा पुन्हा एकदा हादरला. पण, या घटनेमुळे उदगीरमधील डॉक्टर, परिचारिक आणि संबंधीत महिलेल्या नातेवाईकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे का, याची तपासणी सध्या केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या तपासणीत तीन डॉक्टरांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर उर्वरित डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित महिलेचे नातेवाईक अशा २६ जणांची कोरोना तपासणी रविवारी (ता.२६) करण्यात आली. या सर्वांचे अहवाल काय येणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी दुपारी तीननंतर हे अहवाल जाहीर करण्यात आले.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रविवारी उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथील २६ व्यक्ती, चाकुर येथील एक व्यक्ती आणि या संस्थेत आलेले सात रुग्ण अशा एकुण ३४ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी या संस्थेतील ७ आणि चाकुर येथील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला. उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथील १८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन व्यक्तींचे अंतिम अहवाल आले नसल्यामुळे या दोन व्यक्तींचे ४८ तासानंतर स्वॅब घेऊन पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उर्वरित तीन व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com