नांदेड, लातूर जिल्ह्यांत तीन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नांदेडमध्ये दोन, तर लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यात मांडवी (ता. किनवट) आणि दिवशी (ता. भोकर) येथील दोन शेतकऱ्यांनी विष पिऊन आत्महत्या केल्या आहेत.

नांदेड - नांदेडमध्ये दोन, तर लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यात मांडवी (ता. किनवट) आणि दिवशी (ता. भोकर) येथील दोन शेतकऱ्यांनी विष पिऊन आत्महत्या केल्या आहेत.

नापिकी, या वेळी करावी लागलेली दुबार पेरणी, पावसाने फिरवलेली पाठ आदींच्या विवंचनेत चिंचखेड (ता. किनवट) येथील शेतकरी विनायक दुलसिंग पवार (वय 50) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दिवशी (ता. भोकर) येथील शेतकरी संतोष चोखोबा कदम (35) यांनी शेतावर विष घेतले. भोकर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. करडखेल (ता. उदगीर, जि. लातूर) येथे तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. अंकुश तुकाराम भंडारे (35) असे त्यांचे नाव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Farmer Suicide in Marathwada