औंढा नागनाथ तालुक्यात धाडसी चोरी, तीन लाख ९७ हजारांचे दागिने पळविले

Aundha Nagnath News
Aundha Nagnath News

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे ता. एक ते दोन जुलैच्या दरम्यान चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून तीन लाख ९७ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी (ता.दोन) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय लोंढे यांच्या लाख येथील राहत्या घरी एक ते दोन जुलैच्या मध्यरात्री ते दुसऱ्या मजल्यावर झोपले असता चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला असता कपाटातील दहा हजार पाचशे रुपयांची सोन्याची दुहेरी मण्यांची पोत, तीन एकदाणी सोन्याची प्रत्येकी दहा हजार पाचशे, एक कानातील सोन्याचे झुमके ज्याची किंमत दोन हजार ८००, तीन जोड कानातील सोन्याच्या पत्त्या आठ हजार ८००, अकरा ग्रॅम कानातील तीन सोन्याच्या जोड पत्त्या ३८ हजार ५००, एक तोळा वजनाचा नेकलेस तीन हजार ५००, साडेतीन तोळ्यांच्या पाटल्या एक लाख पाच हजार पाचशे, दीड तोळ्याचे सेव्हनपीस पाच हजार २५०, साडेतीन तोळ्यांच्या गव्हाळ मन्याच्या तीन पोत एक लाख पाच हजार पाचशे, तीन तोळ्यांचे एक गंठण १० हजार ५००, एक एकरा ग्रॅम सोन्याचे लॉकेट तीन हजार ८५०, वीस तोळ्यांची पायातील चांदीची साखळी सोळाशे रुपये, एक बाजूबंद व कमरेची चेन नऊ तोळे वजनाची जुने ७२ हजार ९० हजार रोकड असा एकूण मिळून तीन लाख ९७ हजार ५२० रुपयांचे दागिने चोरट्याने पळविल्याची तक्रार संजय लोंढे यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, पोलिस निरीक्षक मलपिल्लू यांनी लाख येथे भेट देऊन चोरी झालेल्या घराची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास भोसले करीत आहेत.

हिंगोली जिल्हा परिषदेची आज विशेष सर्वसाधारण सभा
हिंगोली, येथील जिल्हा परिषदेची मागील सभा कोरमअभावी तहकूब झाल्याने शुक्रवारी (ता.तीन) होणार आहे. हा ट्वेंटी- ट्वेंटी सामना अधिकारी विरुद्ध पदाधिकारी, सदस्य यांच्यात चांगलाच रंगणार आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. मात्र, ही सभा कोरमअभावी अध्यक्षांनी तहकूब केली. त्यानंतर मात्र कोरोना संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू केल्याने सभा, आंदोलने यांच्यावर बंदी घातली गेली. त्यामुळे सभा किंवा स्थायीची बैठक संख्येअभावी होऊ शकली नसल्याने जिल्हा परिषदेच्या विषय समित्या रखडल्या आहेत.

आता सुमारे पाच महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेला जिल्हा प्रशासनाने अटी व शर्थींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा हा सामना अधिकारी विरुद्ध सदस्य यांच्यात रंगणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज होणारी सर्वसाधारण सभा लक्षात घेता कोरोना प्रादुर्भाव पाहता संपूर्ण सभागृह सॅनिटायझरने फवारणी करण्यात आला आहे. एकंदरीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी (ता.तीन) होणारी विशेष सर्वसाधारण सभा ही गाजणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com