three lakh stocks seized by drunk pills
three lakh stocks seized by drunk pills

औरंगाबाद पोलिसांची तेलंगणात धडक कारवाई, नशाकारक गोळ्यांचा तीन लाखांचा साठा

औरंगाबाद - तेलंगणातील निजामाबाद येथून औरंगाबादेत नशा, गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने निजामाबादेत एका मेडीकल दुकानात धडक कारवाई केली. यात तब्बल
तीन लाख दोन हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून मेडीकल मालकाची चौकशी सुरु आहे. 

नवजीवन कॉलनी हडको येथून सागर बाबुराव शिंदे (रा. मयुरनगर, हडको) याच्याकडून 19 ऑक्‍टोबरला गुन्हेशाखा पोलिसांनी गुंगीकारक गोळ्यांचा साठा जप्त केला होता. त्यात अबॉर्ट किट, ट्रोयकॉफ, ट्रीकॉडीन, गर्भ निरोधक, ऍल्प्राकॅड 0.5, सेक्‍स उत्पीडन गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. बेकायदेशिररित्या हा माल त्याच्याकडे सापडल्यानंतर या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यात यापुर्वी शाहीद रज्जाक गडबडे याला गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे गर्भपाताचे साहीत्य, गोळ्या तसेच गुंगीकारक गोळ्याही सापडल्या होत्या.

त्याच्या चौकशीतुन निजामाबाद (तेलंगणा) येथील गणेश मेडीकल एजन्सीतून हा माल आणल्याचे त्याने सांगितले. यानंतर गुन्हेशाखा पथकाने निजमाबाद येथे गणेश मेडीकल एजन्सीत छापा घालुन तीन लाख दोन हजार 940 रुपयांचा माल जप्त केला. यानंतर एजन्सी मालक एम. राजेंद्र यांची तपासाच्या अनुशंगाने चौकशी सुरु आहे. 

बेकायदा व्यवहार 
कोणतीही औषधी खरेदी करताना ती कुणाला खरेदी केली, कधी खरेदी केली. यासह इतर बाबींची नोंद संबंधित मेडीकल वितरकाला करणे बंधनकारक आहे. परंतु गणेश मेडीकल एजन्सीकडून कोणत्याताही नियमाचे पालन न करता या औषधी खरेदी करण्यात आले होते. 
-- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com