गोवानिर्मित मद्यासह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त;उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 12 जून 2018

नांदेड : उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने कारवाई करत गोवा निर्मित मद्यासह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नंदीग्राम सोसायटीमधून एकाला अटक केली आहे. नांदेड शहरात गोवा निर्मित मद्य अनधीकृतपणे विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले. या पथकानी मंगळवारी (ता. १२) सकाळी नंदीग्राम सोसायटीमध्ये छापा टाकला. 

उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी दयालसिंग नारायणसिंग कोटतिर्थवाले (वय ३४) यांच्याकडुन गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, गोल्डन एस. ब्ल्यू फाईन व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ८० बॉटल, आणि दारु वाहतूक करणारी फोर्ड फियस्टा कार असा दोन लाख ८२ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. दयालसिगं कोटतिर्थवाले याला जागीच अटक केली. या पथकामध्ये निरीक्षक डी. एन. चीलवंतकर, एस. एस. खंडेराय, पी. ए. मुळे, बी. एस. मंडलवार, ए. एम. पठाण, मोहमद रफी, यांच्यासह जवान बालाजी पवार, पी. पी. इंगोले, अरविंद वाडगुरे आदींचा सहभाग होता. या प्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक श्री. पठाण हे करीत आहेत. 

Web Title: three lakhs cash and liquor made by gova seized by department of excise department