Covid-19 : नळदूर्गमध्ये एक तर परंड्यात दोन नवे रुग्ण

Three new Covid-19 cases in Osmanabad
Three new Covid-19 cases in Osmanabad
Updated on

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथून ११ जणांच्या स्वॅबचे नमुने कोविड-१९ च्या तपासणीसाठी लातूर येथे पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल आज (ता. १२) प्राप्त झाले अजून, त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १४२ वर पोचली आहे. दरम्यान, आज सकाळी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तथा सध्या लातूर येथे उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये एक रुग्ण नळदुर्ग येथील असून, पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात तो आला होता. इतर दोघे परंडा येथील पोलिस कॉलनीतील असून, ते सोलापूर रिटर्न्स आहेत. 

जिल्ह्यात कोरानाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत बाधित झालेल्यांपैकी ९९ जण बरे झाले. जिल्ह्यामध्ये आता सात हजार ४३४ इतक्या संशयितांची संख्या आहे. त्यातील सात हजार ४१२ लोक क्वारंटाइन करण्यात आले आहेत. सहा हजार ४५४ होम तर ९५८ लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत पाच हजार १३१ जणांनी १४ दिवसांचा क्वारंटाइन काळ पूर्ण झाला आहे. एक हजार ६५८ इतक्या लोकांना रोगमुक्त करून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत दोन हजार १३६ लोकांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यातील १४२ पॉझिटिव्ह आले तर एक हजार ८५८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये तीन बाधित रुग्ण हे परजिल्ह्यामध्ये बाधित झाले असले तरी जिल्ह्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
 
तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना आणि इतर आजारामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू उस्मानाबादमध्ये तर एकाचा उमरगा येथे झाला. मृतांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील एक, कळंब तालुक्यातील आणि उमरगा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्ण, कंसात बरे झालेले रुग्णसंख्या  

  • उस्मानाबाद - ५६ (३९)
  • तुळजापूर - ०७ (०९)
  • उमरगा - १६ (१५)
  • लोहारा - ०७ (०१)
  •  कळंब - ३५ (२२)
  • वाशी - ०४ (०)
  • भूम - ०३ (०) 
  • परंडा - १५ (१३)
  • एकूण -१४२ (९९)
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com