esakal | हिंगोलीत नवीन तीन रुग्ण; दहा जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच दहा कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १८६ वर गेला आहे. तर २५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १९१ संशयितांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.

हिंगोलीत नवीन तीन रुग्ण; दहा जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : चौंढी खुर्द (ता. सेनगाव) येथील १७ वर्षीय युवक व हयातनगर (ता. वसमत) येथील दोन व्यक्तींना कारोनाची लागन झाल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेले आठ व हिंगोली येथील आयसोलेशन वार्डातील दोन, असे एकूण दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १८६ वर पोचला आहे. त्यापैकी १६१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सद्य:स्थितीत २५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी जिल्‍हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार घेणारे गंगानगर येथील एक समूदाय आरोग्य अधिकारी व सेनगाव तालुक्‍यातील माझोड येथील एक, असे एकूण दोन रुग्ण बरे झाले.

हेही वाचाउदरनिर्वाहाचा प्रश्न, तरीही कोरोनाला हरविण्याची जिद्द 

दहा कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडले

 शिवाय कळमनुरी कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे घोडा कामठा, कांडली, आडा येथील प्रत्येकी एक व चाफनाथ तीन, येडशीतांडा येथील दोन, अशा एकूण दहा कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. तसेच सेनगाव तालुक्‍यातील चोंढी खुर्द येथील १७ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे. 

कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १८६ वर

सदरील विद्यार्थी व त्‍याचे पालक मुंबईमधून सेनगाव तालुक्‍यात आले आहेत. वसमत तालुक्‍यातील हयातनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे. यात एक १२ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. ती व तिचे पालक मुंबई येथून वसमत तालुक्‍यात आलेले आहेत.
सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १८६ वर गेला असून १६१ जणांना घरी सोडण्यात आले आहेत, तर २५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १९१ संशयितांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीतुन पुन्हा गुढ आवाज 

कळमनुरी तालुका कोरोनामुक्त

कळमनुरी : येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले तालुक्यातील आठ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने गुरुवारी (ता. चार) त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे कळमनुरी तालुका कोरोनामुक्त झाला आहे. गुरुवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने, डॉ. बालाजी जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत कोरोनामुक्त ग्रामस्थांना गावी रवाना केले. 

सध्या ३० संशयित रुग्ण 

यात एका आठवर्षीय बालकाने उपचार व पथ्य पाळत कोरोनाला हरविले आहे. येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या ३० संशयित रुग्ण आहेत. त्यांचा अहवाल दोन दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सध्या तालुक्यात कोरोना आजाराचा एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.