बिंदुसरा तलावावर सेल्फी घेताना दोघांचा बुडून मृत्यू, एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पुणे येथील स्वप्नला सिद्धार्थ गायकवाड (वय सहा) ही मुलगी आपल्या आत्याच्या गावी ब्रम्हगाव (ता. माजलगाव) येथे आली होती. रविवारी धुणे धुण्यासाठी ती आत्यासोबत तलवावर गेल्यानंतर तोल जाऊन ती आतमध्ये पडली. तिचा बुडून मृत्यू झाला.

बीड : दोन घटनांमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याच्या घटना रविवारी (ता. सहा) जिल्ह्यात घडल्या. माजलगाव येथील माजलगाव डॅममध्ये सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तर, बीडजवळील बिंदुसरा धरणात सेल्फी काढताना बुडून दोन तरुण मावस भावंडांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले.

पुणे येथील स्वप्नला सिद्धार्थ गायकवाड (वय सहा) ही मुलगी आपल्या आत्याच्या गावी ब्रम्हगाव (ता. माजलगाव) येथे आली होती. रविवारी धुणे धुण्यासाठी ती आत्यासोबत तलवावर गेल्यानंतर तोल जाऊन ती आतमध्ये पडली. तिचा बुडून मृत्यू झाला. तर, बीडमध्ये नातेवाईकांकडे सुट्यासाठी आलेले नुरजहा खान आजमखान (वय १९, रा. हैदराबाद), मोहम्मद साकेब बाबु (वय २०, रा. पैठण) व हिना कौसर मोमीन वाजेद (रा. बीदर) हे तिघे रविवारी दुपारी परिसरातील पाली येथील बिंदुसरा धरणावर गेले.

सेल्फी काढत असताना तिघेही तलावात पडले. यातील नुरजहा खान आजमखान व मोहम्मद साकेब बाबू या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर हिना कौसर मोमीन वाजेद जखमी झाली. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 

Web Title: Three people were drowned while taking selfie in the bindusara lake