esakal | स्थानिक गुन्हे शाखेतील तिन पोलिस कर्मचारी निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

जिंतुर येथील सुरेश जयस्वाल नामक अट्टल गुन्हेगारांबरोबर नियमितपणे मोबाइलवर संपर्क, संभाषण करीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीचे पाठराखण केल्याबद्दल शरद मुलगीर, विशाल वाघमारे व उध्दव सातपुते या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील तिन पोलिस कर्मचारी निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिंतूर येथील गुन्हेगार व्यक्तीशी हितसंबंध ठेवल्याबद्दल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी निलंबित केले आहे. बुधवारी (ता. एक जुलै) रात्री पोलिस अधीक्षकांनी निलंबितचे आदेश काढले आहेत.

जिंतुर येथील सुरेश जयस्वाल नामक अट्टल गुन्हेगारांबरोबर नियमितपणे मोबाइलवर संपर्क, संभाषण करीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीचे पाठराखण केल्याबद्दल शरद मुलगीर, विशाल वाघमारे व उध्दव सातपुते या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांनी कर्तव्यात, बेकायदेशीर, बेशिस्त, बेजबाबदार, संशयित, विपर्यंस्त, हेकेखोर वर्तणूक केले.

हेही वाचा - संत नामदेव महाराज पालखीला परवानगी नाकारली- भाविकांमधून नाराजी
 

नैतिक अधःपतनाचे गैरवर्तन केल्याचा ठपकाही या आदेशात ठेवण्यात आला आहे. दरम्यान या कार्यवाहीने पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. या आधीही या प्रकरणात एका पोलिस अधिका-याविरूध्द जिंतूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल झाला आहे. पाठोपाठ शासकीय सेवेतून बडतर्फही करण्यात आले होते.

परभणीत दोन लाखाचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त

परभणी : शहरातील मध्यवस्तीतील आर.आर.टॉवरलगत छोटया बोळीतील एका दुकानातून अवैधरित्या गुटख्याची वीक्री केली जात होती. याची चाहूल पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी(ता.एक जुलै) सायंकाळी दोन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला.

हे देखील वाचाच - एकरकमी वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के सवलत : महावितरण
  
या दुकानातून तंबाखूजन्य वेगवेगळे पदार्थ सर्रासपणे विक्री होत होते. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर सुध्दा त्या विक्रेत्याने विक्रीचा सपाटा सुरू ठेवला होता. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास ती बाब निदर्शनास आली. तेव्हा पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास खोले यांच्या नेतृत्वाखाली भारत नलावडे, अजहर पटेल, दया पेटकर, जगन्नाथ भोसले, सुधीर काळे, पुंजाजी साळवे यांनी ही कारवाई करीत दोन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता. या संदर्भात तपशीलवार माहिती आली नाही.