पंजाब, हरियाणाचे तीन हजार शीख यात्रेकरू नांदेडात अडकले

प्रल्हाद कांबळे
Sunday, 29 March 2020

या भाविकांना महाराष्ट्र शासनाने विशेष व्यवस्था करून त्यांच्या घरी पाठवावे. अशी मागणी पत्रकार रवीन्द्रसिंघ मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंघ, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्याकडे केली आहे. 

नांदेड : देशात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ता. २५ मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आले. तसेच कलम १४४ अंमलात आणली गेली. या दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि इतर ठिकाणाहून आलेले जवळपास तीन हजारावर भाविक नांदेडमधेच अडकून पडले आहेत. या भाविकांना महाराष्ट्र शासनाने विशेष व्यवस्था करून त्यांच्या घरी पाठवावे. अशी मागणी पत्रकार रवीन्द्रसिंघ मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंघ, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्याकडे केली आहे. 

नांदेड शहर हे शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्‍या जाते. येथे असलेल्या सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून हजारो शिख भाविक नांदेडात येत असतात. असेच शिख बांधव दर्शनासाठी आले होते. मात्र  सध्या देशात लॉकडाऊन असल्याने जवळपासतीन हजार भाविक अडकुन पडले आहेत. सायंकाळी शीख भाविकांची कैफियत रविंद्रसिंग मोदी यांनी ऐकूण घेतली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना पत्रकार मोदी यांनी पुढे म्हटले की, तेलंगाना आणि मध्यप्रदेशमध्ये लॉकडाउन दरम्यान गोळ्या मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली तर मोठी समस्या निर्माण होईल. तेव्हा भाविकांना वेळीच घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि नांदेड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचाकार्य करणारे व त्यांची दखल घेणारी माणसं मोठी असतात- डॉ. हनुमंत भोपाळे

पंजाब सरकार पुढाकर घेत आहे

दोन- तीन दिवसांपूर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री स. अमरिंदर सिंघ यांनी नांदेडमध्ये अडकलेल्या भाविकांना घरी परतण्यासाठी हालचाल सुरु केली. पण त्यांचे संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचला की नाही या संदर्भात माहिती मिळाली नाही. तरी देखील पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी रवींद्र सिंघ मोदी यांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand Sikh pilgrims from Punjab, Haryana were trapped in Nanded