कुश, अर्पिता, देविका अन्‌ प्रगती...

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यांचा नामकरण सोहळा शनिवारी पार पडला.
औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यांचा नामकरण सोहळा शनिवारी पार पडला.

औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती अशी नावे देण्यात आली.

प्राणिसंग्रहालयात कालपासूनच आनंददायी वातावरण होते. सर्वत्र फुगे लावून व्यासपीठ सजविण्यात आले. उपस्थितांनी टाळ्या वाजवत पाळणा म्हटला व चार बछड्यांचा नामकरण विधी पार पडला. बछड्यांची नावे सुचविण्यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. सुमारे दीड हजार नावे नागरिकांनी सुचविली होती. त्यातील ४० नावे अंतिम करण्यात आली. ड्रॉ पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून एक नर व चार मादी बछड्यांना नावे देण्यात आली. प्राजक्ता चौधरी या मुलीने सुचविलेले ‘कुश’ हे नाव नर वाघाला देण्यात आले. वाघाची आत्या म्हणून प्राजक्ताचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतर अर्चना कुक्कटगावकर यांनी सुचविलेल्या अर्पिता या नावाची चिठ्ठी निघाली. प्रगती, देविका अशी नावे अन्य दोन बछड्यांना देण्यात आली.

बुंदीलाडू, पेढे वाटून नामकरण सोहळा संपल्याचे जाहीर करण्यात आले. व्यासपीठावर आमदार मनीषा कायंदे, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, गटनेते गजानन बारवाल, मकरंद कुलकर्णी, सभापती मनीषा लोखंडे, मीना गायके, नगरसेवक शिवाजी दांडगे, सुनीता आऊलवार, माजी नगरसेवक किशोर नागरे, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com