आज बॅंकांत येणार 112 कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - आज येणार, उद्या येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या बॅंका आणि खातेधारकांची प्रतीक्षा संपली. दूध डेअरी चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री 112 कोटी रुपयांच्या शंभर व दोन हजार रुपयांच्या नोटा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह काही बॅंकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.

हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर औरंगाबादमध्ये केवळ एकवेळा दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडून आल्या होत्या. त्यानंतर आज, उद्याच्या प्रतीक्षेत बॅंका आणि खातेधारक होते. मंगळवारी मध्यरात्री स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत 112 कोटी रुपयांच्या शंभर आणि दोन हजार रुपयांच्या नोटा दाखल झाल्या. बुधवारी या नोटांवरील सिरीअल क्रमांक नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण करून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत वितरित होणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

तीन बॅंकांसाठी 67 कोटी
प्राप्त 112 कोटी रुपयांपैकी एसबीएच (सिल्लोड शाखा) 22 कोटी, एसबीएच (शहागंज) 23 कोटी आणि आयडीबीआय बॅंकेला 22 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. या तीन बॅंकांना 67 कोटी रुपये मिळणार असल्याने या बॅंकांचे खातेधारक, नोटा बदलून घेणारे नागरिक आणि बॅंक अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हे पैसे या बॅंकांना गुरुवारी वापरण्यास मिळतील.

सध्या चलनात असलेल्या नोटांची आवश्‍यकता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, 112 कोटी रुपये शहरात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे रांगा कमी होण्यास मदत होईल. लवकरच पुन्हा रोख रक्‍कम येईल, अशी अपेक्षा आहे.
- प्रल्हाद मगरे, उपव्यवस्थापक (रोकड), स्टेट बॅंक ऑफ इंडिया

Web Title: Today, banks will be Rs 112 crore