esakal | आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात, मराठवाड्यातील ४ हजार १३४ ग्रामपंचायतींचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

4gram_20panchayat

काही ठिकाणी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत आणि नंतर ती रद्द करून मतदानानंतर सर्वच ठिकाणी नव्याने सोडत काढण्याच्या निर्णयामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना बुधवारपासून (ता.२३) ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरवात होत आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात, मराठवाड्यातील ४ हजार १३४ ग्रामपंचायतींचा समावेश

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : काही ठिकाणी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत आणि नंतर ती रद्द करून मतदानानंतर सर्वच ठिकाणी नव्याने सोडत काढण्याच्या निर्णयामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना बुधवारपासून (ता.२३) ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरवात होत आहे. निवडणूक प्रक्रियेत मराठवाड्यातील ४ हजार १३४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत असेल. यात २५, २६ आणि २७ डिसेंबरला सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे कार्यालय सुरु राहील त्या दिवशी इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करावे लागतील. ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी चिन्हे वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. १५ जानेवारीला मतदान, १८ जानेवारीला मतमोजणी होईल.


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

औरंगाबाद- ६१८
बीड-१२९
नांदेड-१०१५
उस्मानाबाद-४२८
परभणी-५६६
जालना-४७५
लातूर-४०८
हिंगोली-४९५

Edited - Ganesh Pitekar