#ToorScam चाकूरमध्येही आढळली तूरडाळीची रिकामी पाकिटे

प्रशांत शेटे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

'स्वस्त तुरडाळ कोणी पळवली' या मथळ्याखाली सकाळ मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर अशाच प्रकारे तालूक्यातील तूरडाळीला पाय फुटल्याची माहिती समोर आली आहे. शेळगाव पासून जवळ असलेल्या मल्याप्पा देवस्थानाच्या डोंगरात तुरडाळीच्या शेकडो रिकामी पिशव्या आढळून आल्या आहेत. चाकूर व उदगीर तालूक्याच्या सीमेवर या पिशव्या आढळल्यामुळे नेमके कोणत्या तालूक्यातील तुरडाळीला पाय फुटले याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. 

चाकुर : शिधावाटप विभागाकडून गोरगरीब जनतेला वाटप करण्यासाठी आलेल्या तूरडाळीला पाय फुटले असून ही डाळ काळयाबाजारात विक्रीसाठी जात असल्यामुळे याची रिकामी पाकीटे शेळगाव (ता. चाकूर) जवळील डोंगरातील झाडीमध्ये आढळून आली आहेत.

'स्वस्त तुरडाळ कोणी पळवली' या मथळ्याखाली सकाळ मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर अशाच प्रकारे तालूक्यातील तूरडाळीला पाय फुटल्याची माहिती समोर आली आहे. शेळगाव पासून जवळ असलेल्या मल्याप्पा देवस्थानाच्या डोंगरात तुरडाळीच्या शेकडो रिकामी पिशव्या आढळून आल्या आहेत. चाकूर व उदगीर तालूक्याच्या सीमेवर या पिशव्या आढळल्यामुळे नेमके कोणत्या तालूक्यातील तुरडाळीला पाय फुटले याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. 

गतवर्षी अतिरीक्त उत्पादनामुळे शासनाने खरेदी केलेल्या तूरीची डाळ तयार करून शिधापत्रीका धारकांना ३५ रूपये किलो दराने देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार प्रत्येक तालूक्यात लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना एक किलो पॅकींगमध्ये डाळीचे पाॅकेट वाटप करण्यात आले आहेत, परंतू गोरगरीब लाभार्थ्यांना ही डाळ मिळण्याएैवजी काळ्या बाजारात याची विक्री होत आहे. सुरूवातील ५५ रूपये किलो असलेले दर कमी करून ३५ रूपये केल्यामुळे काळ्याबाजारात डाळीची सर्रास विक्री होत आहे. बाजारात तुरडाळीचा ७० रूपये प्रतीकिलो भाव झाल्यामुळे शासनाच्या डाळीला पाय फुटले असून एकाच वेळी शंभरच्या जवळपास रिकाम्या पिशव्या एकाच ठिकाणी आढळून आल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Toor dal sacm in chakur