लातूरच्या गिर्यारोहकाने सर केले माउंट एल्ब्रुस

लातूर - युरोपमधील माउंट एल्ब्रुस सर करून लातूरचा युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे याने तेथे शनिवारी भारताचा ध्वज फडकवला.
लातूर - युरोपमधील माउंट एल्ब्रुस सर करून लातूरचा युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे याने तेथे शनिवारी भारताचा ध्वज फडकवला.

लातूर - युरोपातील सर्वांत उंच मानल्या जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मीटर आहे, अशा शिखरावर लातूरचा युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे याने आणि त्याच्या दहा जणांच्या संघाने भारताचा ध्वज फडकवून शनिवारी (ता. सहा) कौतुकास्पद कामगिरी केली. हा माझ्यासाठी खरोखरीच अविस्मरणीय असा क्षण आहे, अशा भावना दीपकने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे भारताचा सर्वांत मोठा ध्वज दीपकने मागील वर्षी फडकवला होता. त्यानंतर आता युरोपमधील माउंट एल्ब्रुस शिखर त्याने सर केले आहे. त्याच्यासोबत या मोहिमेत विविध राज्यांतील १० गिर्यारोहकांचा समावेश होता. महाराष्ट्रातून दीपक हा एकमेव होता. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर दीपकने ‘सकाळ’शी संवादही साधला. 

माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत असते. याबाबचे योग्य ते प्रशिक्षण तो २९ जून रोजी भारतातून रवाना झाला होता. त्यानंतर १ जुलैपासून शिखरावर चढाई करण्यास सुरवात झाली. ही मोहीम शनिवारी (ता. सहा) सकाळी पूर्ण झाली. प्रचंड थंडी आणि वाऱ्याचे घोंगावणारे झोत अशा वातावरणात आम्ही सहा दिवस काढले. वातावरण सतत बदलत होत होता, तरी आम्ही मोहीम पूर्ण केली. माझ्यासोबत तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश अशा राज्यांतील गिर्यारोहक होते. विशेष म्हणजे दोन मुलींचाही या मोहिमेत समावेश होता. त्यापैकी एका मुलीने हे शिखर सर केले, असा अनुभव दीपकने सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com