esakal | नांदेड शहरातील साठे चौकावर वाहतुकीचा भार 

बोलून बातमी शोधा

फोटो

शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीचा प्रचंड भार वाढला असून त्या ठिकाणी कर्तव्यावरील फौजदार सोपान उर्फ प्रकाश थोरवे व चार पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्यावरही तणाव येत आहे.

नांदेड शहरातील साठे चौकावर वाहतुकीचा भार 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या जीवघेण्या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही उपटसुंबे दुचाकीस्वार पोलिसांनाच काही ठिकाणी हुज्जत घालून लाठ्यांचा प्रसाद खात असल्याचे पहावयास मिळते. शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीचा प्रचंड भार वाढला असून त्या ठिकाणी कर्तव्यावरील फौजदार सोपान उर्फ प्रकाश थोरवे व चार पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्यावरही तणाव येत आहे.
 
नांदेड शहर व जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांनी नाकाबंदी केली असून चोख बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. शहरातील आयटीआय, वर्कशॉप कॉर्नर, राज कॉर्नर, तरोडा नाका, छत्रपती चौक, कलामंदीर, कुसुमताई चौक, वजिराबाद चौक, चिखलवाडी कॉर्नर, भगतसिंग चौक, आसना बायपास, शंकरराव चव्हाण चौक, नमस्कार चौक, बर्की चौक, देगलुरनाका, जुना गंज, लातूर फाटा, सिडको, हडको, ढवळे कॉर्नर, चंदासिंग कॉर्नर, मिल गेट, खडकपूरा, भगतसिंग चौक, महाराणा प्रताप चौक, शिवमंदीर चौक, पिरबुऱ्हाननगर, आनंदनगर, भाग्यनगर, अण्णाभाऊ साठे चौक यासह आदी मुख्य चौकात पोलिसांचा तगडा बंदबोस्त लावण्यात आला आहे. 

हेही वाचाकोरोना : नांदेडचे ते पाचही रिपोर्ट निगेटीव्ह

काही रिकामटेकडेसुद्धा पोलिसांशी हुज्जत घालत आहेत

काही चौकातील वाहतुक वळविल्याने अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीचा भार वाढला आहे. शहरातील जवळपास ७० टक्के वाहने याच चौकातून जात असल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मात्र कारवाई करण्यास अडचण येत आहे. काही रिकामटेकडेसुद्धा पोलिसांशी हुज्जत घातल आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविला तर वाहतुकीला आळा घालता येऊ शकतो.

येथे क्लिक कराVideo:अशोक चव्हाण म्हणाले, अत्यंत चिंताजनक....काय ते वाचा..

वरिष्ठ पोलिस अधिकारी रस्त्यावर 

अत्‍यावश्यक सेवेच्या नावाखाली काहीजण नाहक आपली दुचाकीवरून स्टंटबाजी करीत आहेत. तर काही ठिकाणी अशी मंडळी पोलिसांच्या लाठीचा प्रसादही खात आहेत. शहरात मागील दोन दिवसांपासून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, इतवारा उपविभागाचे धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे, संदीप शिवले, अनिरूद्ध काकडे, संजय ननवरे, पंडीत कच्छवे आणि अनंत नरुटे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सतत बंदोबस्त कामी रस्त्यावर आहेत. त्यांना नांदेडकरांनी बाहेर न पडात सहकार्य करावे असे आवाहन पोलिस विभागाकडून करणय्त येत आहे.