accident in mixer machine and bike
sakal
लासूर स्टेशन - गंगापूर तालुक्यातील कायगाव-देवगाव राज्य मार्गावर वळई नदीच्या पुलाजवळ गुरुवारी (ता. दोन) हनुमान जयंतीच्या दिवशी हृदयद्रावक घटना घडली. रस्ते कामावरील मिक्सर मशीनने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पित्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.