
Drowning Accidental Death
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 येथील एका अकरा वर्षीय बालकाचा खेळताना पाय घसरून पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड शहरालगत असलेल्या लालवाडी तांडा येथील इयत्ता सहावी मध्ये एका इंग्रजी शाळेत शिकत असलेल्या राजवीर विलास राठोड हा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना पाय घसरून पाझर तलावात पडुन शनिवारी (ता.4) दुपारी एक वाजेच्या दरम्यान हि घटना घडली.