बीड - किरकोळ भांडणानंतर पतीला व्हिडिओ कॉल करून पत्नीने संपविले जीवन. त्यानंतर काही वेळाने पतीनेही जीवन संपविल्याची घटना केतुरा (ता. बीड) येथे घडली. शुभांगी अक्षय गालफाडे (वय-२१) व अक्षय हरिभाऊ गालफाडे (२५) असे जीवन संपविणाऱ्या दांपत्याचे नाव आहे. दोघांच्या पार्थिवावार गुरुवारी (ता. तीन) अंत्यसंस्कार करण्यात आले.
केतुरा येथील अक्षय गालफाडे व डोमलगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील शुभांगी यांचा विवाह ४० दिवसांपूर्वीच झाला होता. लग्नानंतर अक्षय पुण्याला गेला. तेथे तो विद्युत फिटिंग, तसेच कंपनीत काम करायचा. नुकताच तो गावाकडे आला होता. बुधवारी (ता. दोन) तो पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाला.
आपल्यालाही सोबत न्यावे, असा हट्ट शुभांगीने धरला. पुण्यात भाड्याने खोली घेतो, त्यानंतर तुला सोबत नेतो अशी समजूत घालण्याचा प्रयत्न अक्षयने केला. मात्र, सोबत नेले नाही तर आत्महत्या करीन, असे ती म्हणाली. दरम्यान, अक्षय पुण्याला जाण्यासाठी निघाला. तो नवगण राजुरीजवळ बसमध्ये असतानाच शुभांगीने व्हिडिओ कॉल करून गळफास लावून घेतला.
तो तेथूनच परतला. शुभांगीच्या मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करताना नातेवाइकांत कुरबुरी झाल्या. यानंतर अक्षय गालफाडे यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनांची नोंद झाली आहे.
बीड तालुक्यातील घटना
चाळीस दिवसांपूर्वीच विवाह
पुण्याला नेण्याचा पत्नीचा आग्रह
दोघांच पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.