नांदेड : एपीआय, पीएसआयच्या जिल्हांतर्गत बदल्या

नांदेड : एपीआय, पीएसआयच्या जिल्हांतर्गत बदल्या

नांदेड : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदारांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (ता. 8) रात्री काढले. त्यात कंधारच्या राणी भोंडवे यांची मुक्रमाबाद तर कपील आगलावे यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाठविले आहे. 

बदली झालेल्यात नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांना आता प्रशिक्षण, बालाजी पल्लेवाड यांना दहशतवाद विरोधी सेलमध्ये पाठवले आहे. जीपीयुचे ए. एन. चव्हाण यांना उपविभागीय पोलीस अधिकारी माहूरचे वाचक, परिवेक्षाधिन फौजदार प्रविण आगलावे वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरिक्षक एस. ए. चव्हाण यांना कंधार, पोलीस उपनिरिक्षक राणी भोंडवे कंधार ते मुक्रामाबाद, कपील आगलावे लोहा ते शिवाजीनगर, ए. एस. शेख लोहा ते मुखेड, जी. एच. होळकर माळाकोळी ते शिवाजीनगर, एस. डी. कऱ्हाळे तामसा ते कंधार, एस. पी. गंगापूरकर कंधार ते बिलोली, शेख जावेद विमानतळ ते नांदेड ग्रामीण, एम. एन. दळवे हिमायतनगर ते भाग्यनगर, डी. एस. कांबळे भाग्यनगर ते कुंडलवाडी, यु. जी. उगले हिमायतनगर ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, एम. एन. नाईक कुंडलवाडी ते विमानतळ, एस. एच. तरडे लोहा, आर. आर. जगाडे तामसा, व्ही. एस. खोले भाग्यनगर, डी. व्ही. लोखंडे वजिराबाद, एस. एल. मालसमिंदर पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड, जी. एन. कराड देगलूर यांना नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com