
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार वसमतचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्याकडे सोपविण्यात आला असून हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अखिल इब्राहिम सय्यद यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हिंगोली : जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार वसमतचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्याकडे सोपविण्यात आला असून हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अखिल इब्राहिम सय्यद यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बुधवारी (ता. नऊ) पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत. यानुसार वसमत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पदभार सोपविण्यात आला होता. तर नांदेड येथून जिल्ह्यात दाखल झालेले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पंडित कच्छवे यांना हिंगोली शहर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात ५९ गावात आढळले दुषीत पाण्याचे नमुने
जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्याकडे वसमत शहरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षामधील कृष्णदेव पाटील यांना सेनगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना पोलीस कल्याण निधी म्हणून पदभार देण्यात आला असून हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अखिल इब्राहीम सय्यद यांच्याकडे यापुढे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुरेश दळवी यांना गोरेगाव पोलिस स्थानकाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात दाखल झालेले वसीम हाश्मी यांची नियंत्रण कक्षातील नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे