esakal | बब्बोव! आपलं सामान गायब झाल्याचं तुम्हाला कळणारही नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

train Travelers scared News

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र याकडे रेल्वे पोलिस प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढविली असती तर मनस्ताप करावा लागला नसता, अशा भावना आता रेल्वे प्रवासी व्यक्त करीत आहेत. 

बब्बोव! आपलं सामान गायब झाल्याचं तुम्हाला कळणारही नाही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र याकडे रेल्वे पोलिस प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढविली असती तर मनस्ताप करावा लागला नसता, अशा भावना आता रेल्वे प्रवासी व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा- गेवराईचा प्रल्हाद लोखंडे, लाच घेताना असे वापरले फंडे, अखेर एक लाख घेताना अटकेत...

अशी आहे चोरीची पद्धत 

प्रामुख्याने चोरी करण्यासाठी चोर हे आरक्षित एसी डबे निवडतात. या डब्यांतून प्रवास करणारे प्रवासी हे मध्यम, उच्च मध्यम वर्गातील असल्याने काहीना काही हाती लागतेच. साखळी पद्धतीने चोरी करताना अगोदर डब्याच्या दोन्ही दरवाजांतून काहीजण डब्यात घुसतात, तिसरा आरोपी झोपलेल्यांवर नजर ठेवून चोरी करतो. 

मराठवाड्यात रोज एक चोरी 

मराठवाड्यातील बीड वगळता सर्वच जिल्ह्यांत रेल्वेचे जाळे आहे. या मार्गावर रोज किमान एक चोरीची घटना समोर येत आहे. चोरीचा तपास होत असला, तरी लोहमार्ग पोलिस कुठे कमी पडतात, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. नांदेड व औरंगाबाद रेल्वेस्थानकावर चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. 

हे वाचलंत का? -माझे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले, वीरपत्नीची व्यथा...काय आहे ते वाचा 

मोठ्या घटनेनंतरही येईल का जाग? 

पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेसने प्रवास करणारा प्रवासी झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्याने पर्ससह मोबाईल असा सुमारे 32 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला होता. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर परळी वैजनाथ लोहमार्ग पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले. आई-वडील व पती-पत्नी प्रवासादरम्यान झोपले असताना लातूरजवळ त्यांचे मोबाईल व पर्स असा सुमारे 32 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. 

क्लिक करा- चर्चा फिस्कटली : कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हटाव 

झोपेचा फायदा घेऊन चोरटे संधी साधतात. आरक्षित डब्यात एकदा टीसी येऊन गेल्यानंतर पूर्ण प्रवास करेपर्यंत एकही पोलिस आलेला दिसत नाही. स्वस्त प्रवास म्हणून निवडलेल्या रेल्वेतील प्रवासाचीच आता धास्ती वाटते. 
-सुभाष अंधारे, प्रवासी, परभणी