आदिवासी विकास केंद्रात गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

शासनाची 60 लाखांना फसवणूक; तत्कालीन प्रकल्प अधिकारी दोषी
औरंगाबाद - एकात्मिक आदिवासी विकास केंद्रामार्फत एचडी पाइप, सायकल, थ्रेशर, शिलाई मशिन, कृषी अवजारांचे लाभार्थ्यांना वाटपच झाले नसून, त्याबाबतचे रेकॉर्डही ठेवण्यात आले नसल्याची बाब उघड झाली आहे. या माध्यमातून शासनाची सुमारे 60 लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी स्थापन चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेल्या तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिलीप देशमुख व अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध सिडको ठाण्यात सतरा जुलैला गुन्ह्याची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन-आठ येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी दिलीप देशमुख 2004 ते 2009 या काळात कार्यरत होते. या कालावधीत आदिवासी विभागासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे काम त्यांच्यावर होते. परंतु, त्यांनी पदाचा गैरवापर करून गोरगरीब, होतकरूंच्या लाभावर डोळा ठेवून गैरव्यवहार केला. चौकशीत दिलीप देशमुख व त्यांच्या कार्यालयातील इतर कर्मचारी दोषी असल्याचे समोर आले. एकूण 59 लाख 30 हजार 172 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे अहवालातून समोर आले. त्यानुसार, दिलीप खोकले यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: tribal development center Non behavioral crime