‘पाड्या’वरील आदिवासी विद्यार्थी गिरविणार ‘असे’ धडे

‘पाड्या’वरील आदिवासी विद्यार्थी.jpg
‘पाड्या’वरील आदिवासी विद्यार्थी.jpg

नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग तसेच प्रशिक्षण केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गतच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या पाड्यावर शिक्षण मिळावे, यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचा चंग प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल बांधला आहे.

शैक्षणिक भवितव्याकडे लक्ष
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत सोळा शासकीय आश्रमशाळा आहेत. आदिवासी म्हटलं की पूर्वीच शिक्षणाचा पुरेसा गंध नसलेली मुल हे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे लक्ष देऊन आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी शिकला पाहिजे ही जिद्द मनाशी बाळगून बंद काळातही किनवट येथील प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना त्यांच्याकडील वर्गातील विद्यार्थ्यांचे व्हॅट्सअ्प ग्रुप तयार करावे. 

‘मायक्रोसॉफ्ट टीम’ ॲप डाऊनलोड करा 
विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासक्रमाशी निगडीत अध्यापन करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. केवळ आदेश देवून ते थांबले नाहीत, तर संबधित अध्यापन बरोबर होते की नाही यावरही त्यांचा वॉच असणार आहे. यासाठी त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट टीम’ हा ॲप सर्व मुख्याध्यापकांना डॉउनलोड करुन घेण्यास सांगितले आहे. यातून दोन - तीन दिवसातून सर्व मुख्याध्यापक यांच्याशी व्हिडिओवरून संवाद साधून शाळेतील अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन करतात. परिणामी शालेय वातावरण ऑनलाईन बनले आहे. त्यामुळे पालक वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच स्वतः पालक आपल्या पाल्यास सोबत घेवून अभ्यास करून घेत आहेत. या कामी प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी के. एस. शेगोकर मेहनत घेत आहेत.

सेपक टोराँ खेळाच्या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन
भारतीय सेपक टाकराँ महासंघ व भारतीय खेळ प्राधिकरण यांच्यावतीने सेपक टोराँ खेळाची ऑनलाईन कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे. सेपक टाकराँ खेळाचा इतिहास, खेळाचे प्रशिक्षण, खेळातील विविध कौशल्य, पुरक व्यायाम, दुखपती व उपचार या सर्व बाबींची माहिती देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर ता. २५ एप्रिल ते ता. ५ मे या कालावधीत होणार आहे. कार्यशाळेत तज्ञ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत सेपक टाकराँ या खेळाची मुलभूत माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे.

नि:शुल्क कार्यशाळा
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही कार्यशाळा निःशुल्क आहे. ऑनलाईन कार्यशाळा ही झुम अ‍ॅपवर होणार आहे. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. हेमराज, डॉ. अमित कुंवर, डॉ. अमृता पांडे यांच्याशी संपर्क साधावा. या अभिनव उपक्रमामध्ये सहभाग घेवून सेपक टाकराँ या आंतरराष्ट्रीय खेळाच्या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय सेपक टाकराँ महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. आर. प्रेमराज, महासचिव योगेंद्र दहिया, महाराष्ट्र सेपक टाकराँ असोसिएशनचे सचिव डॉ. सुखदेव विश्वास, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सेपक टाकराँ असोसिएशनचे सचिव प्रविणकुमार कुपटीकर आणि प्रशिक्षक रविकुमार बकवाड यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com