मुस्लीम बांधवांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध - रावसाहेब दानवे

नवनाथ इधाटे
मंगळवार, 22 मे 2018

फुलंब्री - मुस्लीम बांधवांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध असून मुस्लीम बांधवांनी येणाऱ्या अडचणी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांना सांगाव्यात. म्हणजे दोघे मिळून मुस्लीम बांधवांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवू असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी दिली. फुलंब्री येथील इदगाह मैदानावर इफ्तार पार्टी व नगरपंचायतीच्या माध्यमातून संरक्षण भिंत व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सर्वप्रथम इदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून पेव्हिंग ब्लॉक व संवरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कामाचे भूमिपूजन श्री. दानवे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.शिरसाठ म्हणाले, नगरपंचायतीच्या कामाचा शुभारंभ पवित्र रमजान महिन्यात केली आहे. जेणे करून भविष्यात फुलंब्री शहरात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामात अडचण येणार नाही असे सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, उपमहापौर विजय औताडे, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती एकनाथ धटिंग, उपनगराध्यक्ष इंदुबाई मिसाळ, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील, तारू अप्पा मेटे, विकास कुलकर्णी, एकनाथ ढोके, गणेश राऊत, अजय शेरकर, गजानन नागरे, अकबर पटेल, रउफ कुरेशी, मुदस्सीर पटेल, योगेश मिसाळ, रवींद्र काथार, आवेज चिस्ती, राम बनसोड, सोमनाथ कोलते, बाबासाहेब शिनगारे, मोबीन पाशा, फेरोज शहा, इस्माइल खान, बाळासाहेब तांदळे, दामोदर पाथरे, वाल्मिक जाधव, कृष्णा पाथरे आदींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Web Title: Tried to solve the problems of Muslim brothers