औरंगाबाद : ट्रुजेटची विमानसेवा 17 ऑगस्टपर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हैदराबाद-औरंगाबाद सेवा देणाऱ्या ट्रुजेट कंपनीचे विमान रविवारी (ता.11) तांत्रिक कारणात्सव रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता सोमवार ते रविवार (ता.12 ते 17 ) दरम्यान विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हैदराबाद-औरंगाबाद सेवा देणाऱ्या ट्रुजेट कंपनीचे विमान रविवारी (ता.11) तांत्रिक कारणात्सव रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता सोमवार (ता.12 ) सोमवार पासून पुढील पाच दिवस शनिवार (ता.17) पर्यंत विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. 

ऑगस्टच्या प्रारंभापासूनच ट्रू-जेटचे विमान वारंवार रद्द होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. औरंगाबाद-हैदराबाद विमान 1, 2, 3 ऑगस्टला सलग तीन दिवस रद्द होते. त्यानंतर 4 ऑगस्टरोजी या विमानाचे उड्डाण झाले. पण सोमवारी (ता.5) देखील उड्डाण रद्द करण्यात आले. त्यानंतर 6 ,7 आणि 9 ऑगस्ट आणि 11 ऑगस्टरोजी या विमानाचे उड्डाण झाले नाही. रद्द झालेल्या विमानांसाठी काही वेळा ऑपरेशनल कारण सांगण्यात आले.

विमान नियमित तपासणीसाठी गेलेले आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी विमानाची तपासणी करणे आवश्‍यक असते, असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trujet flight cancellation upto 17th august