लोकाभिमुख पोलिसिंग करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस 

योगेश पायघन
शनिवार, 7 जुलै 2018

22 कोटी 27 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जी प्लस दोन मजली इमारतीत नियंत्रण कक्ष, सायबर क्राईम सेल, गुन्हे शा खेचे स्वतंत्र लॉकअप, सोशल मीडिया कक्ष, मिटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉलच्या अत्याधिनिक सेवा सुविधा पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शासकीय कामात भूमिपूजन झाल्यानंतर उद्घाटन कधी याची नेहमी चिंता असते. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या ग्रीन इमारतीने वेळेत काम पूर्ण होऊन कामाची गती व गुणवत्ता या इमारतीच्या कामातून दिसले. प्रशस्त तर आहेच पण फंक्शनलही आहे. लोकाभिमुख पोलिसिंग इफेक्टिव्ह करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, ही इमारत त्या कामात मदत करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

औरंगाबाद येथील शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.7) दुपारी दोन वाजता पार पाडला. नियोजित वेळेच्या दीड तास उशिरा सूरु झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शहर विभागाचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील,  डॉ भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, आमदार इम्तियाज जलील, आमदार सुभाष झांबड, आमदार सतीश चव्हाण, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, गृह निर्माण पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी 532 निवासस्थाने बांधून देण्याबद्दल आभार मानले. 

22 कोटी 27 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जी प्लस दोन मजली इमारतीत नियंत्रण कक्ष, सायबर क्राईम सेल, गुन्हे शा खेचे स्वतंत्र लॉकअप, सोशल मीडिया कक्ष, मिटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉलच्या अत्याधिनिक सेवा सुविधा पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच ऊर्जा बचतीसाठी 73 हजार विजेची निर्मिती करण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आले आल्याची माहिती महासंचालक बिपिन बिहारी यांनी दिली. आभार उपायुक्त दीपाली धाटे घाडगे यांनी मानले.

Web Title: Trying to better policing says Devendra Fadnavis