औरंगाबाद जिल्हा बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

सचिन चोबे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सिल्लोड : भवन (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे सिल्लोड- औरंगाबाद मुख्य रस्त्यावर असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

सिल्लोड : भवन (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे सिल्लोड- औरंगाबाद मुख्य रस्त्यावर असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

बुधवारी (ता. 5) पहाटे साडेतीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांना भवन येथील जिल्हा बँक शाखेच्या काही अंतरावर एक कार उभी दिसली. चौकशी करण्यासाठी पोलिस थांबले असता कारमध्ये चालक व पाठीमागे एक व्यक्ती बसलेला दिसला. पोलिसांना बघताच वाहन चालकाने कार सुरु करून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता पिंपळगाव पेठ रस्त्याने एक ते दीड किलोमीटर चोरटे पळाले व कार रस्त्यात सोडून अंधारात कपाशी शेतातुन पसार झाले. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी याची सूचना पोलिस ठाण्यास देत अतिरिक्त कर्मचारी बोलावून चोरट्यांचा शोध घेतला.परंतु चोरटे पसार झाले. कार (एमएच.20.बीसी.2385) पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात दोन लोखंडी कटर, चार लोखंडी कटवण्या, एक धारदार चॉपर, एक मोठा स्क्रू ड्रायव्हर अशी हत्यारे व कटरने कट केलेले 3 कुलूप सापडले.       

कारही चोरीची
कारमध्ये मिळालेल्या कागदपत्रांनुसार काकासाहेब थोरे (रा.घारेगाव, पोस्ट आडुळ) नावाचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक, आधारकार्ड, मोबाइल मिळाले. त्याच्यांशी सम्पर्क केला असता त्यांनी कळवले की कार त्यांचीच असून 3 दिवसांपूर्वी चोरीला गेली. त्याची तक्रार चिकलठाणा पोलिस ठाण्यात केली आहे.

Web Title: trying robbery at aurangabad district bank sillod