फेसबुक लाईव्ह करत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

फेसबुक लाईव्ह करत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर- शहरातील एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

लातूर शहरातल्या औसा रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणीनं गुड़ नाईटचे लिक्वीड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री दोनच्या सुमारास फेसबुक वर लाइव्ह गुड़ नाईट मधील लिक्विड पित असल्याचे आणि आत्महत्या करत असल्याचे ती सांगत होती. 

हा प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या तरुणीचे घर गाठले आणि तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची परिस्थिति स्थिर असून धोक्याबाहेर आहे. वृषाली सूर्यवंशी असे फेसबुक वर तिचे नाव असल्याचे समजत आहे. ही बातमी पसरताच फेसबुक वरुन ते अकाऊंट हटविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com