तुळजाभवानीला चांदीची अंबारी, सिंह आणि पाटा अर्पण

जगदीश कुलकर्णी
सोमवार, 9 एप्रिल 2018

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या छबिना मिरवणुकीसाठी पुण्यातील विजय उंडाळे आणि श्री. टोळगे कुंटूबियांकडून चांदीची अंबारी, चांदाचा सिंह आणि पाटा अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिराला अर्पण करण्यात आलेल्या या वस्तूंचे १९ किलो ५६० ग्रॅम एवढे वजन आहे.

तुळजाभवानी मंदिर समितीचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. उंडाळे आणि श्री. टोळगे कुटुंबियांकडून दिलेल्या चांदीच्या या अंबारीतून मंगळवारपासून (ता. १०) छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिरात छबिना वाहनाची यामुळे भर पडली आहे. 

यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा उपस्थित होते. श्री. उंडाळे आणि श्री. टोळगे कुटुंबियांनी रविवारी रात्री कालाष्टमीनिमित्त या वस्तू अर्पण केल्या आहेत.

Web Title: tuljabhavani sliver ornaments