आई तुळजाभवानीचा चैत्री यात्रोत्सव आज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. मंगळवारी (ता.11) यात्रोत्सवातील मुख्य कार्यक्रम पार पडणार असल्याने सोमवारी (ता.10) दुपारपासून भाविक शहरात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ कायम होती. तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा मंगळवारी साजरी होणार आहे. सोमवार दुपारपासून हलग्या वाजवत भाविकांचे जत्थे शहरात दाखल होत होते. तुळजाभवानी मंदिरात चैत्री यात्रेनिमित्त तुळजाभवानी देवस्थान समितीने सकाळी सातपासून अकरापर्यंत होणारे अभिषेक सकाळी सहा वाजताच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title: tuljabhavani yatrotsav

टॅग्स