90-Year-Old Woman Collapses Before Voting in Tuljapur
Sakal
मराठवाडा
Tuljapur News : तुळजापूरात मतदानासाठी आलेल्या ९० वर्षीय महिलेचा मतदानापुर्वी गंभीर अटॅकने मृत्यू!
Voting Incident : तुळजापूरात मतदानासाठी आलेल्या ९० वर्षीय राजश्री भोसले यांचा मतदानापूर्वीच अचानक अटॅकने मृत्यू झाला. पोलिस आणि कर्मचार्यांनी रुग्णालयात हलवले तरी त्यांना वाचवता आले नाही.
तुळजापूर : तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रभाग क्रमांक आठवर मतदानासाठी आलेल्या 90 वर्षीय महिलेचा मृत्यु मंगळवारी ता.2 दुपारी झाला. तुळजापूरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील प्रभाग क्रमांक आठ येथे मतदानासाठी आलेल्या राजश्री संदीपान भोसले (वय 90) राहणार तुळजापूर या दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रावर आल्या होत्या. तेव्हा त्यांना मतदान केंद्रात नातेवाईकांसह मतदान केंद्रात घेऊन जाण्यात आले. त्यावेळी अचानकपणे त्यांना भोवळ आल्यासारखे जाणवले.

