esakal | Tuljapur : आजपासून आदिशक्तीचा जागर
sakal

बोलून बातमी शोधा

tuljapur

Tuljapur : आजपासून आदिशक्तीचा जागर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : घटस्थापनेचा मुहूर्त साधत उद्यापासून राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली होत आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, वणी आदी मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. भाविक‘याचि देहा, याची डोळा’ आराध्य दैवतांची मूर्ती डोळ्यात साठविण्यास उत्सुक आहेत.

तुळजापूरम्ये मंदिरात परंपरेनुसार धार्मिक विधी होतील. दरम्यान, नवरात्रोत्सवापूर्वीच गेल्या दोन दिवसांपासून शहरात मोठी गर्दी होत असून आजही ती कायम होती. तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती गुरुवारी (ता. ७) सिंहासनावर अधिष्ठित केल्यानंतर अभिषेक होईल. दुपारी बाराला घटस्थापना होणार आहे.

हेही वाचा: नाथषष्टी: तुकाराम बीजेला नाथांच्या वाड्यातील २१ फुट खोल व ९ फुट रुंद रांजण भरण्याची प्राचीन परंपरा

शाही दसरा सोहळा यंदाही रद्द

कोल्हापूरात जोतिबा व अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुले होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. दसऱ्याच्या दिवशी दसरा चौकात होणारा शाही दसरा सोहळा यंदाही रद्द केला असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

अंबाजोगाईतील, योगेश्वरी देवीच्या मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश असणार नाही. पुजेचे साहित्यही आत नेण्यास निर्बंध आहेत. मंदिरातील धार्मिक विधी वगळता कुठलेही इतर कार्यक्रम होणार नाहीत.

‘सप्तशृंगी’साठी ऑनलाइन बुकिंग

सप्तशृंगी मातेच्या नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेस हजर राहाण्यासाठी भाविकांनी ऑनलाइन पास बुक केले आहेत. दरम्यान, बुधवारी सांयकाळपासून प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली.

loading image
go to top