मोठी आग लागल्याने लोकमंगल साखर कारखान्याच्या अग्निशामक गाडी बोलावून आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती वाहक बी. ए. गोरे यांनी लोहारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक तुकाराम घोडके यांना दिली.
लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याजवळ (Lokmangal Sugar Factory) तुळजापूर आगाराच्या (Tuljapur Bus) बसने अचानक पेट घेतला. बस चालकच्या प्रसंगावधानामुळे बसमधील विद्यार्थ्यांसह ७० प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना शुक्रवारी (ता. १४) सकाळी पावणेनऊ वाजता घडली.