तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशात बदल; पुजाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे प्रशासनाची कारवाई

जगदीश कुलकर्णी 
Wednesday, 6 January 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन पुजाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

तुळजापूर  (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांना मंदिरातील उत्तरेकडील भवानी शंकर गेटने सिंहाच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने काढलेला आहे. तुळजाभवानी मंदिरातील येत्या 21 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली तुळजा भवानी मंदिराच्या भोपे, पाळीकर, उपाध्ये या तिन्हीही पुजारी मंडळांच्या प्रतिनीधींसमवेत शाकंभरी नवरात्राची बैठकीत चर्चा झाली.

यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले की, उस्मानाबादेत झालेल्या बैठकीत तुळजा भवानी मंदिरात कोरोनाच्या पाश्वभूमीवर तिन्हीही पुजारी मंडळांनी सहसंमतीपत्र दिल्याने पुजाऱ्याना मंदीरातील उत्तर बाजूच्या भवानी शंकर गेटने सिंहाच्या गाभार्यात प्रवेश देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन पुजाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची सत्ता जाणार? अमित देशमुखांनी घातलं औशावर लक्ष

पुजाऱ्यांना नोटीसा-
तुळजाभवानी मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या 8 पुजाऱ्याना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी करून पुढे सहा महिने मंदीर प्रवेश बंदी का वाढविण्यात येऊ नये याचा खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामध्ये खालील पुजाऱ्यांचा समावेश आहे. कुलदीप सुनील औटी, पंकज भाऊसाहेब कदम, संपत त्र्यंबकराव गंगणे, संदीप भगवान टोले, लखन रोहिदास भोसले, ओंकार लक्ष्मीकांत भिसे, आकाश परदेशी, अभिजीत माधवराव कुतवळ यांचा समावेश आहे. 

पाळी नसताना गाभार्यात प्रवेश केल्याप्रकरणी 16 जणांना नोटीस- 
तुळजाभवानी मंदिरात पूजेची पाळी नसताना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देऊल कवायतचे कलम 36 चे उल्लंघन केलं होतं. देऊल कवायतचे कलम 24 व 25 चा वापर करून सहा महिन्यांसाठी तुळजाभवानी मंदिरात प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या कारणे दाखवा नोटीसा 16 पुजाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

त्यामध्ये सत्यजित विलास कदम, विशाल सुनील सोंजी, शशिकांत बाबुराव पाटील, अक्षय भैय्ये कदम, अथव॔ कदम, शशिकांत किसन कदम परमेश्वर, बुबासाहेब नरसिंगराव पाटील, सौरभ शशिकांत कदम परमेश्वर, सुहास सुरेश कदम भैय्ये, आकाश कदम भैय्ये, आनंद पाटील, नेताजी मुकूंदराव पाटील, विशाल नेताजी पाटील, दिनेश दिपकराव परमेश्वर, साथ॔क दिलीप मलबा यांचा समावेश आहे अशी माहिती तुळजा भवानी मंदीर समितीच्या वतीने देण्यात आली. 

तुळजाभवानी मंदिरात मुख्य गाभार्यात प्रवेश करण्यासाठी पितळी दरवाजा तसेच जामदारखान्यापासून जाणारा रस्ता आहे. तसेच नहाणीगृहापासून चोपदार दरवाज्यापरयत जाता येते. याशिवाय भवानी शंकरासमोरून कडीच्या दरवाज्यापासून सिंहाच्या गाभार्यापरयत आणि त्यानंतर चोपदार दरवाज्यापरयत जाऊन मुख्य गाभार्यात जाता येते. तुळजा भवानी मंदीर प्रशासनाने भवानी शंकर गेटने पुजार्यांना प्रवेश देण्याचा आदेश आज ( ता.5 ) काढलेला आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tuljapur news ambabai temple Administration action against