तूर उघड्यावर अन्‌ शेतकरी वाऱ्यावर! 

उदयकुमार जोशी 
मंगळवार, 25 एप्रिल 2017

अहमदपूर - "एक महिन्यापासून तूर उघड्यावर पडली असून, अजून त्याचा काटा झालेला नाही. जागेवर पोते फुटत असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. गावाकडून रोज चकरा मारण्यात पैसा आणि वेळ खर्च होत असून शासनाने आमच्या तुरीची लवकर खरेदी करावी, अशी मागणी तालुक्‍यातील थोरलीवाडी येथील विजयकुमार फुलमंटे डोळ्यांत पाणी आणून करीत होते. अशीच तक्रार तालुक्‍यातील महादेववाडी येथील सोमनाथ चामे, ज्ञानोबा मुस्के तसेच कोपदेव हिप्परगा (ता. अहमदपूर) येथील त्र्यंबक गोरटे यांचीही होती. 

"नाफेड'च्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी करण्याची घोषणा झाल्यानंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी हमीभावाचे खरेदी केंद्र असलेल्या नांदेड महामार्गावरील राज्य वखार महामंडळाच्या आवारात तूर आणून टाकली. बाजार समितीकडून टोकन मिळालेल्या काही शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली; मात्र महिन्यापूर्वी बाजार समिती कडून टोकन मिळूनही अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी केली गेली नाही. त्यामुळे जवळपास 20 हजार क्विंटलपेक्षा अधिक काटा न झालेली तूर खरेदी केंद्रावर पडून आहे. 

शनिवारपर्यंत (ता. 22) शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दिली होती; मात्र शनिवारी खरेदी केंद्राच्या आवारात आलेली तूर व त्याआधी महिन्यापासून टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीविना तशीच केंद्राच्या आवारात उघड्यावर पडून आहे. बारदाना संपल्यामुळे ही तूर खरेदी करता आली नाही, असे बाजार समितीचे सचिव राजू भूतडा यांनी सांगितले. शनिवारअखेर एकूण 37 हजार 623 क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीमधील अडत्यांनीही हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करायची नाही, अशी नोटीस बाजार समितीने बजाविल्यामुळे त्यांनीही तुरीची खरेदी बंद केली असल्याने एकूणच शेतकरी अडचणीत आले आहेत. 

""बारदाना कमी पडत असल्याने तूर खरेदीत अडचण निर्माण होत असून, पुरेसा बारदाना उपलब्ध झाल्यानंतर तुरीची खरेदी करण्यात येईल.'' 
- ऍड. भारत चामे, सभापती, बाजार समिती. 

""शनिवारी आपण स्वतः तूर खरेदी केंद्रावर थांबून वजनकाट्याच्या संख्येत वाढ करण्यास सांगितले. शिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या. पालकमंत्री संभाजी पाटील यांच्याशी चर्चा करून हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी निश्‍चितपणे मुदत वाढवून घेऊ.'' 
- शिवाजीराव भिकाणे, सरपंच, ढाळेगाव 

Web Title: tur issue in marathwada