उपनिबंधकांच्या कक्षात ओतली तूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

परभणी - तूर खरेदीची मुदत वाढवावी, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांडील तूर खरेदी करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधकांच्या कक्षासह त्यांच्या खुर्चीवर तूर ओतून आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत कूर्मगतीने होणाऱ्या तूर खरेदीचा प्रशासनाला जाब विचारला.

जिल्हा उपनिबंधक कामानिमित्त कार्यालयाबाहेर होते. त्यांची वाट पाहून कार्यकर्ते घोषणाबाजी देत जिल्हा निबंधकाच्या कार्यालयात शिरले. आंदोलकांना भेटण्यासाठी सहायक निबंधक पाठक आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना विलंबाने तूर खरेदीबाबत जाब विचारला. मागण्यांचे निवेदन दिले. मंगळवारी (ता. 15) तूर खरेदीचा समारोप असल्याने उर्वरित 13 हजार 74 शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कार्यकर्त्यांनी निबंधकांच्या कक्षासह जिल्हा उपनिबंधकांच्या खुर्चीवर तूर ओतली. आंदोलकांचे म्हणणे तसेच शिल्लक तुरीची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविण्याचे आश्वासन पाठक यांनी दिले.

Web Title: tur purchasing government office