esakal | भरदिवसा पंचवीस लाख पळवणारे दोघे चोवीस तासात जेरबंद, परळीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Image 2020-09-03 at 11.23.32

औरंगाबादच्या प्लास्टिकचा व्यावसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे भरदिवसा कारमधून २५ लाख रुपये पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी चोवीस तासात वैजापूर (जि. औरंगाबाद) येथून अटक केली.

भरदिवसा पंचवीस लाख पळवणारे दोघे चोवीस तासात जेरबंद, परळीतील घटना

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड)  ः औरंगाबादच्या प्लास्टिकचा व्यावसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे भरदिवसा कारमधून २५ लाख रुपये पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी चोवीस तासात वैजापूर (जि. औरंगाबाद) येथून अटक केली. प्लास्टिकचे होलसेल व्यापारी संजय गंगवाल हे वसुलीसाठी परळी येथे आले होते. वसुली करून येथील मोंढा भागात चारचाकी वाहन उभे केले होते. त्यावेळी वाहनातील बँग मधील रोख रक्कम २५ लाख रूपये चोरट्यांना पळवून नेले होते.

Lakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगबग, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, हनुमान मुंडे यांनी वैजापूर परिसरातून दोन आरोपीस अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेली कार व रोख रक्कम २४ लाख ८ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात हे करत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर