नांदेड : 26 लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

twenty six lakh worth of gutka has been seized at nanded Local crime branch action
twenty six lakh worth of gutka has been seized at nanded Local crime branch action

नांदेड : देगलूर नाका परिसरात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी आपले सहकारी पांडुरंग भारती यांना घेऊन रविवारी 23 जूनच्या पहाटे दीडच्या सुमारास कारवाई केली.

नेकलेस रस्त्यावर ट्रक क्रमांक (एमएच 30-6599) थांबून तपासणी केली. त्यात अनधिकृतपणे विक्री करण्यासाठी आणलेला विविध कंपन्यांचा गुटखा 30 पोते जप्त केले. ट्रक चालक आणि इतर सर्व आरोपी पोलीस दिसताच ट्रक सोडून पसार झाले. अन्न व औषध प्रशासनाचे उमेश कावळे यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल एसपी संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांनी स्थागुशाचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com