नांदेडच्या ‘या’ महाविद्यालयात पक्षांचा किलबिलाट

फोटो
फोटो

नांदेड : हल्ली शहरात पक्षांचा किलबिलाट फारसा कानावर पडत नाही. पक्षांचा आवाज ऐकण्यासाठी दूर कुठेतरी जंगलात अथवा शेतात जावे लागते. मात्र, नांदेड शहरात काही ठिकाणी पक्षांचा किलबिलाट ऐकु येते. याला सायन्स महाविद्यालय अपवाद नाही. महाविद्यालयाच्या कॅम्प स्थापनेपासून या भागात विविध पक्षांचा वावर राहिला आहे. हे पक्षी कॅम्पस बाहेर जाऊ नयेत म्हणून महाविद्यालयाकडून पक्षांकरिता शंभर घरटे बांधण्यात आली आहेत. घरटी बांधुन त्यांना महाविद्यालयाने हक्काचे घर मिळवुन दिले आहे. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी दाणा- पाणी याची व्यवस्था करण्यात येते.

येथे आढळतात दुर्मिळ पक्षांचे थवे

सायन्स महाविद्यालयाचा परिसर मोठा व झाडाझुडपाने भरगच्च असल्यामुळे या परिसरात मोर, लांडोर, पोपट, कबुतर, पारवे, खारूताई, घुबड, चिमण्या यासारखे अनेक दुर्मिळ पक्षांचे थवे आढळुन येतात. यामुळे महाविद्यालय परिसरात नेहमी विविध पक्षांचा मंजुळ आवाज कानी पडतो. पक्षांच्या या मंजुळ आवाजामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आलेल्या नवीन व्यक्तीला कॅम्पसमधुन बाहेर पडावेसे वाटत नाही.

याचा वापर केला घरटे बांधण्यासाठी

अशी जन्मली घरट्यांची कल्पना- सायन्स महाविद्यालयात अनेक मोठी झाडे आहेत. या झाडावर पक्षांनी घरटे बांधुन त्यात अंडी देत पिल्लांना जन्म दिला जातो. परंतु, जोराच्या पाऊस - वाऱ्यामुळे  अनेक पक्षांची घरटी उद्धवस्त होतात. खोप्यातुन अंडी खाली पडुन फुटतात. हे अनेकांना देखवत नव्हते आणि यातुनच प्राचार्य डॉ.डी.यु.गवई यांच्या संकल्पनेतुन दोन वर्षापूर्वी कॅम्पसमध्ये पडुन असलेल्या फर्निचर व लोखंडी पत्र्यापासून पक्षांसाठी हक्काचे घरटे तयार करण्याची कल्पना जन्माला आली आणि महाविद्यालयातील उंच ठिकाणी पक्षांसाठी एक दोन नव्हे तर, चक्क शंभर घरटे तयार करण्यात आली.

पक्षांना पडला असेल यक्ष प्रश्‍न, घरटे बांधले कुणी ? 
 
पक्षी हे कधीच कोणत्या गोष्टीकरिता कुणावर विसंबुन राहत नाहीत. काडी, कचरा गोळा करुन ते स्वतःचे घरटे तयार करतात आणि त्यात राहतात. त्यामुळे महाविद्यालयात पक्षांकरिता बांधण्यात आलेले घरटे कसे, कुणी आणि का बांधले या विषयी जणू पक्षांनी सहा महिण्यापर्यंत घरट्यात न राहताच दुरून निरीक्षण केले होते. त्यानंतर मात्र पक्षांना हे घर त्यांच्यासाठीच असल्याचा विश्वास आला अन् पक्षांनी आपापले घरटे ताब्यात घेण्यास सुरवात केली. आज या परिसरात शंभर पक्षांच्या जोड्या या घरट्यात वास्तव्यास आहेत.

अजून दीडशे पक्षांसाठी व्यवस्था सुरू 
  
परिसरात अजून दीडशेहून अधिक पक्षांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पुढील काळात महाविद्यालयाकडून या पक्षांकरिता स्वतंत्र घरटे बांधण्यासाठीची तयारी सुरू आहे. त्यांच्यासाठी दाना-पाण्याची व्यवस्थादेखील केली आहे.  
प्राचार्य डॉ. डी. यु. गवई सायन्स महाविद्यालय, नांदेड. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com