दहशत पसरविणाऱ्या दोघांना अटक; दोन पिस्तुल जप्त

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 23 जुलै 2018

हातात पिस्तुल व फायटर घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. त्यांच्या दोन पिस्तुल व फायटर जप्त करून मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

नांदेड : मुखेड शहराच्या बाऱ्हाळी नाका परिसरात हातात पिस्तुल व फायटर घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. त्यांच्या दोन पिस्तुल व फायटर जप्त करून मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना व पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे हे आपल्या पथकासह जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मुखेड तालुक्यात रविवारी (ता. 22) गस्तीवर होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी मुखेड शहरातील बाऱ्हाळी नाका येथे सापळा लावला. यावेळी दारुच्या नशेत शिवराज उर्फ शिवा कुंडगीर  (वय २१) आणि बंटी उर्फ आनंदा सोनकांबळे (वय २३) दोघे राहणार मुखेड हे हातात विनापरवाना पिस्तुल व दुसऱ्याच्या हातात फायटर असे दोघेजण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना धमकावत होते. हा प्रकार पोलिसांनी पाहिल्यानंतर मोठ्या शिताफिने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल (एअर गण) व खंजर जप्त करुन धुलाई करत मुखेड ठाण्यात हजर केले. या प्रकरणी विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरुन मुखेड ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रतिबंध यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार एस. ए. पवार हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Two arrested for spreading dismay Two pistols seized