दुचाकी चोरटा गजाआड, २९ दुचाकी जप्त; हिंगोली पोलिसांची कारवाई

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील चोरीच्या एकूण २९ दुचाकी एका चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याची माहिती पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. १५) सकाळी देण्यात आली.
चोरीच्या दुचाकी
चोरीच्या दुचाकी

हिंगोली : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील चोरीच्या एकूण २९ दुचाकी एका चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याची माहिती पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. १५) सकाळी देण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना सुचना दिली. यावरुन श्री. खंडेराय यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या पोलिस उपनिरीक्षक के. डी. पोटे यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी बोके, शंकर जाधव, सुनिल अंभोरे, विठ्ठल कोळेकर, संभाजी लकुळे, शंकर ठोंबरे, राजु ठाकुर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे चालक शख जावेद यांना सोबत घेऊन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या.

एसपी श्री. कलासागर यांच्या आदेशावरुन कारवाई

दुचाकी चोरी संदर्भाने गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गही कारवाई केली. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे, औंढा हद्दीतील मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे चोरीच्या दुचाकी चोरी करणारे तसेच त्या दुचाकी विकत घेणाऱ्या लोकांची माहिती काढून दुचाकी चोरटा सचिन खिल्लारे रा. गडदगव्हाण ( ता. जिंतर ) व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी दुचाकी चोरी करुन बनावट आरसी बुक तयार करुन चोरीच्या दुचाकी गडदगव्हाण, दाभा, जोड परळी, टेभुर्णी, डिग्रस येथे विक्री केल्या असल्याबाबत खात्री झाल्यावरुन सदर आरोपी यांचे ताब्यात हिंगोलीतील दोन, नांदेड दोन, परभणी एक, वाशिम तीन, औरंगाबाद दोन, अकोला एक, बुलढाना एक व इतर जिल्ह्यातील अशा २९ दुचाकी मिळून आल्या.

हेही वाचा - नांदेड डाक घर पासपोर्ट सेवा केन्द्रात मनमानी कारभार, ग्राहकांमधून संताप

हे आहेत मदत करणारे चोरटे

चोरट्याने त्याचा मामा हरीदास टापरे, अरविंद टापरे रा. पांगरी यांनी दुचाकीचे चेचीस क्रमांक व इंजीन क्रमांकवर खाडतोड करुन बनावट आरसी. बुक तयार करुन व काही दुचाकीचे कागदपत्रे नंतर देतो असे खोटे सांगून विक्री केलेल्या लोकांकडून २६ दुचाकी व त्यांचे घरासमोर लावण्यात आलेल्या तीन दुचाकीअसशा २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

२९ दुचाकींची किमत अंदाजे १५ लाख ६५ हजार रुपये

२९ दुचाकींची किमत अंदाजे १५ लाख ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सदर आरोपी व फरार आरोपी यांचे कडून हिंगोली व इतर जिल्हयातील अधिक चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. हरीदास टापरे हा दुचाकी चोरी करण्यात सराईत असुन त्याच्या विरुध्द यापुर्वी सुध्दा पोस्टेला गुन्हे दाखल असून दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या.

शनिवार (ता. १७) पर्यंत पोलिस कोठडी

हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बंदखडके, उपनिरीक्षक श्री. कांबळे, धामने करीत असुन सदर गुन्हयातील आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यास शनिवार (ता. १७) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com