Coronavirus : उस्मानाबादसाठी गूड न्यूज, पती-पत्नीची कोरोनावर मात

दिलीप गंभिरे
शुक्रवार, 22 मे 2020

उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना शुक्रवार (ता.२२) आरोग्य प्रशासनाच्या वतीने फुलांची उधळण करत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) ः येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तालुक्यातील पाथर्डी येथील पती पत्नी यांनी कोरोनावर मात केली आहे. १४ मे रोजी हे दांपत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे तालुक्यात सुन्न वातावरण निर्माण झाले होते. उपजिल्हा रुग्णलयातील योधाने अतिशय गांभीर्याने परस्थिती हाताळली होती.गेली दहा दिवसापासून या रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.अखेर रूग्णालयाच्या वतीने त्याचे उपचारादरम्यान पुन्हा स्वॅब पाठवण्यात आले होते, त्याचे स्वाब नमुने निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना शुक्रवार (ता.२२) आरोग्य प्रशासनाच्या वतीने फुलांची उधळण करत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागच्या दहा दिवसापासून या दांपत्यावर उपचार सुरू होते. यावेळी त्यांना रूग्णांतील कर्मचाऱ्यांनी भावनापूर्ण फुलांचा वर्षाव व टाळ्यांचा कडकडाट करत गावाकडे जाण्यासाठी निरोप देण्यात आला.यावेळी रूग्णांसह उपस्थित सर्वांचे डोळे पानवाले होते.गेली दहा दिवसापासून उपचार करणाऱ्या आरोग्य दुताचे रुग्णांनी हात जोडुन आभार मानले.

हादरा : उस्मानाबादमधील या गावात कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका

पाथर्डी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रंजना पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार मंजूषा लटपटे, नायब तहसीलदार अस्लम जमादार,वैद्यकीय  अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, गटविकास अधिकारी, नामदेव राजगुरू, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, भाजपचे नेते अजित पिंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीपकुमार  जाधव, डॉ.रामकृष्ण लोंढे, डॉ. सुधीर आवटे, डॉ. नीलेश भालेराव, नगरसेवक सतीश टोणगे, माजी नगरसेवक शिवाजी कराळे, पाथर्डी सरपंच रंजना पिंगळे, उपसरपंच अर्जुन जाधव, पोलिस पाटील बालाजी चिंचकर यांच्यासह रूग्णांलयातील ईश्वर भोसले यांच्या कर्मचारी,पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
 
जिल्ह्यातील स्थिती
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 23 वर पोचली आहे, त्यातील चार जणांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आरोग्य प्रशासनाला यश मिळाले. अजूनही 19 रुग्ण उपचार घेत असून, त्यातील एकाला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये आजवर सापडलेल्या रुग्णांकडून संपर्कातील लोकांना संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले होते. मात्र, गुरुवारी आलेल्या अहवालात रुग्णांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने आता काळजी घेण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Coronavirus Patients Recover at Kalamb Dist Osmanabad